औरंगाबाद: कुठलाही अनुचित प्रकार न घडला निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाली आहे. आयुक्तालय हद्दीतील 1168 मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
औरंगाबाद शहराचे वातावरण मागील दोन वर्षात जातीयवादी दंगलीनी ढवळून निघाले आहेत. दंगलीची पार्श्वभूमी असलेल्या औरंगाबादेत लोकसभा निवडणुकीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही.या साठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण 1168 मतदान केंद्र आहेत.या मतदान केंद्रावर आयुक्तालयातील 2700 पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर राहणार आहे. या शिवाय एसआरपी च्या तुकड्या,होमगार्ड, तैनात असणार आहे.या शिवाय पोलीस अधीकारी यांच्या वाहनावर उच्चप्रतीचे सीसीटीव्हीचे कॅमेरे राहणार आहे. या शिवाय काही भागात कॅमेरामन देखील घटनेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.